छत्रपती शंभुराजे परिवार

महाराष्ट्र राज्य 

नियम व अटी 


१) परिवाराचा लोगो आणि नावाचा गैरवापर करताना कुणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

 २) परिवारात आपण आपल्यातील मी पणा सोडुन सर्वांशी प्रेमाने वागा.   उच- नीच , गरीब-श्रीमंत या गोष्टी परिवारात सामील होताना बाहेर ठेऊन या.

३) इथे फक्त मराठी भाषेतूनच बोलावे.

४) कोणत्याही मावळ्यांशी बोलत असताना नम्रतेने बोलावं एकेरी उच्चार नकोच... (आदर द्या _आदर घ्या).

५) हा msg पाठवा तुम्हाला तुमच्या आईची, साईची शपथ आहे असे msg करणारे त्यांनी तर "परिवार लगेच सोडावा कारण त्याची काही गरज नाही.

६) हा आपला परिवार फक्त सोशिअल मिडीयापुरता मर्यादित नाही तर प्रत्यक्ष कार्य करणारा आहे आणि सर्वांचे विचार घेऊनच चालेल.

७) इतिहास सोडून राजकीय तसेच कोणत्याही timepass पोस्ट आपल्या परिवारात पोस्ट करणे टाळावे. या परिवारात ऐतिहासिक पोस्टला महत्व आहे.

८) परिवारात असून फक्त पोस्ट वाचून सोडून द्यायचे असेल त्यांनी ही हा "परिवारात सामिल होऊ नये आणि इथ प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.

९) आपण लेखक कवी असेल तर आपले स्वागत. या परिवारात फक्त ऐतिहासिक विषयावरील लेख , कविता पोस्ट कराव्यात. इतिहास सोडून लेख / कविता ग्रुप मध्ये नकोय.

१०) परिवारातील कोणत्याही शिवकन्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

११) आपल्याला फक्त शिव'शंभुंनी दाखविलेल्या आदर्शावर /रस्त्यावर चालायचं आहे हे विसरु नये.

१२) आपल्या परिवारात प्रश्नमंजुषा , शिवदिनविशेष उपक्रम चालू आहेत. त्यामुळे  दुसर्या संघटनेतील शिवदिनविशेष प्रश्नमंजुषा या परिवारात टाकणे टाळावे. ( तेच तेच परत msg परिवारात येत असतात. जास्त msg मुळे महत्वाचे msg ingore होतात. )

१३). Hi gm gn या गोष्टीना परिवारात जागा नाहीये. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात.

१४). कोणतीही ऐतिहासिक पोस्ट करताना ती काळजी पूर्वक वाचा. शहानिशा करा मगच परिवारात पोस्ट करा. चुकीचा इतिहास पसरवू नये.

१५). परिवाराचे आपण सभासद , जिल्हा प्रमुख , अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव कोणीही असलात तरी सर्वांचे मत घेऊन निर्णय घ्यावे. हा शिवकार्य करण्यासाठी एकत्र आलेला परिवार आहे. कोणाचे हट्ट पुरवणे हा परिवाराचा हेतू नाहीये.

१६). आपला कोणताही व्यवसाय असेल मोबाईल, शुटिंग तसेच अन्य व्यवसाय असेल तर आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसिद्ध करु नये.. माहिती ग्रुपमध्ये पाठवु नये.. तुम्ही वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ शकता..


कृपया सहकार्य करावे...🙏🏻🚩


👉🏻 या पैकी कोणताही नियम मोडल्यास लगेच परिवारातून तिन दिवसात काढले जाईल.


 !! वारसा मराठा साम्राज्याचा !!

                   !!  वसा गडकोट संवर्धनाचा !!

🚩🚩