छत्रपती शंभुराजे परिवार प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३..!
छत्रपती शंभुराजे परिवार पुणे विभाग आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा आज(१७ऑगस्ट)रोजी प्रगती विद्या मंदिर, इंदुरी येथे पार पडली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत 350(२००मोठा गट, १५०छोटा गट) पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांशी अनेक गोष्टीवर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी इतिहासातून काय घ्यावं याचे मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवराय व त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्या विषयी काय वाटत या बदल त्यांच्या सोबत चर्चा केली. या उपक्रमाचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक *श्री. पारधी सर,पर्यवेक्षक श्री.वाजे सर यांनी व त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाने केले.* या कार्यक्रमास आपल्या परिवाराचे कार्याध्यक्ष *पवन मदने,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रतिक येवले, राधानगरी विभाग प्रमुख प्रणव पोवार, मावळ विभाग उपाध्यक्ष प्रविण भुजबळ तसेच बारामती तालुका प्रमुख शुभम साळुंके* इ. सदस्य उपस्थित होते.
*वारसा मराठा साम्राज्याचा !!*
*वसा गडकोट संवर्धनाचा..!!*