स्वराज्याची पहिली राजधानी
“राजीयांचा गड राजगड”....🚩 डोंगराच्या देखणेपणाविषयी काय सांगावं ।
तीन दिशांना तीन सोंडा, आणि मधोमध माथ्यावर लहानगं पठार असलेला प्रचंड कडा, असं राजगडाचं रूप आहे हे असं रूप कोण्या अन्य किल्ल्याला लाभलं नाहीं..💓
दुर्गनिर्मितीच्या दृष्टीने हा डोंगर अजोड आहे तटांत दोन बालेकिल्ले असलेला राजमाची, मद्रासपलिकडलातीन शृंग असलेला जिंजी,
पण राजगडच्या डोंगराची जी शान आहे ऐट आहे ती केवळ देवदुर्लभ आहे👌
शिवदुर्गबांधनीतील अनेक प्रयोग आजही आपल्याला अचंबित करतात गडकोट पाहता पाहता हे दुर्गावशेष अभ्यासले तर या राजगडावर असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बाबी गडाचे हे दुर्गावशेष गडाला एक गडाचे परिपूर्ण रूप देतात...♨️
#डूबा : सुवेळा माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात.
या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे येथे असणारे चौथरे येसाजी कंक तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती.
#चिलखती_बुरुज :
हल्ल्याच्या दृष्टिने नाजूक ठिकाणी असे बुरूज असतात गडाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे याच्या नावातच समजते संरक्षणाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे चिलखतच आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजगडची संजिवनी माची.
अद्भूत अविश्वासनीय अकल्पनिय असे हे बांधकाम नेहमीच्या बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संरक्षण म्हणजे चिलखती बुरूज.
शत्रूच्या हल्ल्यात चिलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूर्ण शाबूत रहावा अशी ही योजना अतिशय संरक्षणात्मक आणि अप्रतिम अशी ही बांधणी.
#हत्तीप्रस्तर :
जेव्हाही समोरून बघतो त्यावेळी एक उभा हत्ती सारखा कातळ हळुवार हलत डुलत त्या चिलखती बुरुजाला डोक्यावर चा ताज बनवून, त्या बालेकिल्ल्याला पाठीवरच्या शामियान्यात बसवून जवळ जवळ येतोय आणि जेव्हा तुमची नजर त्या नेढ्याकडे जाते तेव्हा नक्की अचंबित वाटतं नाहीका!
एवढा मोठा कातळ आपल्या पोटात एक पोकळी निर्माण करून बसलाय तरीही तो समोरून एक नयनरम्य भासतो...!
ती पोकळी जणू त्याचा आधार बनलीये...
त्या चिलखती बुरुजाला तिने असं मायेसारखं डोक्यावर धरलंय...
काय रे आयुष्य, तुझ्या कडे बऱ्याच पोकळ्या आहेत ना हत्ती प्रस्तर सारख्या..!
त्याच्यासारखं समोरच्याला नेहमी आनंद देत रहा आणि चिलखती बुरुजासारखा अभिमानाने तुझ्या आयुष्याचा पसारा डोक्यावर घेऊन हसत रहा एवढंच...!