छत्रपती शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य.!!🚩
!! वेड इतिहासाचे !!🚩
---------------------------------------------

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त छत्रपती शंभुराजे परिवार कोल्हापूर विभाग आयोजित प्रश्नमंजुषा उपक्रम काल दिनांक ३ जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमास राधानगरी तालुक्यातील १२ शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमास ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. छत्रपती शिवराय , छत्रपती संभाजी महाराज तसेच मराठ्यांचा पराक्रमी इतिहास या बाल विद्यार्थ्यांना कळायला हवा , तसेच या इतिहासाच्या माध्यमातून या मुलांना भावी आयुष्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम छत्रपती शंभुराजे परिवार कोल्हापूर विभागाने आयोजित केला होता.
प्रथम क्रमांक मारुतीराव वारके ( आबाजी ) विद्यालय तुरंबे यांनी पटकवला..!

द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी हायस्कूल तारळे यांनी मिळवला..!




तृतीय क्रमांकवर किसनराव मोरे हायस्कूल सरवडे या शाळेने मिळवला..!!


या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच सर्व नियोजन छत्रपती शंभुराजे परिवार राधानगरी प्रमुख प्रणव भाऊ पोवार यांनी केले होते.

वारसा मराठा साम्राज्याचा !!
वसा गडकोट संवर्धनाचा !!🚩