महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काडून ज्या माउलीने गुलामगिरी च्या छाताडावर प्रहार केला ,हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ,छत्रपती शिवरायांना ज्ञान ,चातुर्थ,चारित्र्य संघटन, पराक्रम ,व सत्वगुणाचे बाळकडू देणाऱ्या आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्म वीर छत्रपती संभाजी महाराज ह्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता राष्ट्रमाता ,माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती अखंड हिंदुस्थानाचा मनाचा मुजरा🙇♂️🧡
आज राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ...छत्रपती शंभुराजे परिवार वडाळी महाराष्ट्र राज्य (वेड इतिहासाचे) यांच्या वतीने भाऊराव मुर्हे यांचे स्वयंचलित वृद्ध आश्रम निमगाव ता.नांदुरा जि. बुलडाणा येथे छत्रपती शंभुराजे परिवार वडाळी तर्फे भोजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला
त्या वेळी वडाळी गावचे जेष्ठ नागरिक लक्ष्मण भाऊ वकटे, भगवान पारस्कार,परिवाराचे सदस्य ,विशाल वकटे ,संचित पारस्कार ,गजानन वकटे ,सागर वकटे, ऋषिकेश वकटे ,वैभव पारस्कार,शुभम पारस्कार,वैभव फासे, वैभव वकटे,भूषण वकटे,विठ्ठल गव्हाणे, मयूर वकटे,विलास वकटे,इत्यादी मावळे उपस्थित होते.