छत्रपती शंभुराजे परिवार

 माळशिरस विभाग 

देशभक्त तरुण घडवायचा असेल तर योग्य वेळी योग्य बाळकडू देणे गरजेचे असते. अखंड हिंदुस्थानचे प्रेरणा स्थान , उर्जास्थान म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्या चरित्र रुपात आपल्याकडे देशभक्त तरुण घडवण्याचे शक्तीपीठ आहे.




 त्यांच्या चरित्राचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. त्यामुळे आपण छत्रपती शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित इतिहास विषयावर महाराष्ट्रातील विविध शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेत आहोत. आज माळशिरस येथील सदाशिवराव माने विद्यालय , मानकी तालुका माळशिरस येथे श्रीगणेशा झाला..!


वारसा मराठा साम्राज्याचा !!
वसा गडकोट संवर्धनाचा !!🚩