किल्याचे ठिकाण :* किल्ले महिमंडणगड हा सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यात आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो. मेंटशिंदी या गावापाऊन पायी अंतर चालत जाण्यास २५-३० मिनट लागतात. मेटशिंदी हे कोकण व घाटमाथा यांच्या सीमेवरील गाव. मेंटशिंदी गावापासून किल्यावर जाताना जंगलीसफर केल्याचा अनुभव येतो. किल्यावर जाण्यासाठी कोणत्याही खुणा किंवा फलक नाही त्यामुळं वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मेंटशिंदी गावातून एखादा वाटाड्या सोबत घेऊन जाणे सोयीस्कर ठरत. किल्यावर जाणाऱ्या वाटेत रानगवे हमखास आढळतात.



हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून कोयनेच्या प्रकल्पामुळे आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावातून जाव लागत. *पाहण्याची ठिकाण : खिंडीपाशी आल्यास महिमंडणगडाचा ताशीव कडा कोकणात कोसळताना दिसतो. तर तिकडे दूर वासोटा , नागेश्वरचा सुळका आणि झाडीभरले डोंगर दिसतात. खिंडीच्या दक्षिण बाजूने वळसा मारून गेल्यास गडमाथा येतो. किल्यावर पाण्याच्या टाक्याची मालिकाच आढळते. इतिहास : किल्याचा उपयोग गडमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा. हा किल्ला भोजराजाच्या काळात बांधलेला आहे. ✒ दुर्गवेडा सुनिल साखरे