श्लोक-धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १ ॥
अर्थ:- धृतराष्ट्र म्हणाला - हे संजया ! धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले ? (१)
श्लोक क्रं 2:-
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्॥२॥
अर्थ :- संजय म्हणाला-तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचेसैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला. (२)
श्लोक क्रं ३:-
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥
अर्थ:- अहो आचार्य ! तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा.(३)
श्लोक क्रं-४
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४ ॥
अर्थ :- येथे (या सैन्यामध्ये ) भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्धारीआहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत.|| ४ ||*
श्लोक क्रं ५-
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ ५ ॥
श्लोक अर्थ :- तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत.५
श्लोक क्रं ६
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ ६ ॥
अर्थ:-तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदी पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत.६
श्लोक क्रं - ७
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ||७||
अर्थ:-हे ब्राह्मणश्रेष्ठ!आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या.
आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो,(७)
श्लोक क्रं - ८
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥८॥
अर्थ:-आपण - द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, (८)
श्लोक क्रं ९
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः।नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ||९||
अर्थ :-इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या स्वास्वानी सुन्न असून युद्धात पारंगत आहेत. (९).
श्लोक क्रं- १०
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्। पर्याप्तं विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।। १०
अर्थ:-भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. (१०)
श्लोक क्रं - ११
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि।।११।।
अर्थ :- म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. (११)
श्लोक क्रं-१२
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान्।। १२॥
अर्थ:- अशाप्रकारे दुर्योधनाने द्रोणाचार्य ना सांगितलेले वचन ऐकून - कौरवातील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अन्तःकरणात आनन्द निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला.(१२)
श्लोक क्रं - १३
ततः शङ्खाश भेर्यर्श्च पणवानकगोमुखाः
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्।।१३।।
अर्थ :- त्यानंतर शंख नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी वादये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला.।।१३।।
श्लोक क्रं-१४
ततः श्वेतेर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थिती
माधव: पाण्डवक्ष्चैव दिल्यौ शङ्खौ प्रदध्मतु:||१४||
श्लोक अर्थ:-त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजविले...||१४||
श्लोक क्रं -१५
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजय।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर:॥१५॥
श्लोक अर्थ:-श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ||१५||
🇮🇳 श्लोक क्रं १६🚩
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः।
नकुलः सहदेवक्ष्च सुघोषमणिपुष्पकौ।।१६।
◆◆श्लोक अर्थ :- कुन्तीपुत्र राजा युधिष्ठिराने अनन्तविजय नावाचा आणि (नकुल व सहदेव) यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले.||१६||◆◆
श्लोक क्रं १७-
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः
धृष्टद्युम्नो विराटक्ष्च सात्यकिक्ष्चापराजितः ||१७||
अर्थ:- श्रेष्ठ धनुष्य असलेला काशिराज, महारथी शिखण्डी, धृष्टद्युम्न,राजा विराट, अजिंक्य सात्यकी, या सर्वांनी, हे राजा ! सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले....
श्लोक क्रं-१८
द्रुपदो द्रौपदेयाक्ष्च सर्वशः पृथिवीपते| सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक् पृथक् ॥१८॥
श्लोक अर्थ:-राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, तसेच महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी, हे राजा ! सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले...
श्लोक क्रं-१९
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्।
नभक्ष्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥
श्लोक अर्थ:-आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली.धृतराष्ट्राचे पुत्र युद्धासाठी तयार झाल्याचे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णास आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन जाण्यास सांगणे. (१९)
श्लोक क्रं २०
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥२०॥
श्लोक अर्थ:- महाराज ! त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला- "हे अच्युता! माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा.
श्लोक क्रं-२१
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१ ॥
श्लोक अर्थ:-अर्जुन म्हणाला हे अच्युत ! कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्रस्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन.
श्लोक क्रं २२
यावदेतान्निरीक्षेहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्रणसमुद्यमे ॥ २२ ॥
श्लोक अर्थ:-मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने झालेल्या शत्रूपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा.(२२)
श्लोक क्रं-२३
अर्जुन उवाच
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ||२३||
श्लोक अर्थ:-दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो...
(२३)
श्लोक क्रं-२४
संजय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वारथोत्तमम् ||२४||
श्लोक अर्थ:-संजय म्हणाला: हे भरतवंशजा! या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला.
श्लोक क्रं-२५
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्
उवाच पार्थं पश्यैतान् समवेतान्कुरूनिति ॥ २५ ॥
श्लोक अर्थ:- भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ!येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा.||२५||
श्लोक क्रं-२६
तत्रापश्यस्थितान् पार्थः पितृनथ पितामहान्|आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्यौत्रान्सखींस्तथा क्ष्वशुरान् सुह्रदक्ष्चेव सेनयोरुभयोरपि ।
*श्लोक अर्थ:-त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचितक यांना पाहिले. ||२६||
श्लोक क्रं २७
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान्
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्
||२७||
श्लोक अर्थ:-तेथे असलेल्या त्या सर्व बान्धवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुन्तीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला.||२७||
श्लोक क्रं २८
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ २८ ॥
श्लोक अर्थ:-अर्जुन म्हणाला - हे कृष्णा ! युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत.
श्लोक क्रं २९
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||२९||
श्लोक अर्थ:-अर्जुन म्हणाला - हे कृष्णा ! युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत.
श्लोक क्रं-३०
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ||३०||
श्लोक अर्थ:-हातातून गाण्डीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभादेखील राहू शकत नाही.||३०||
श्लोक क्रं - ३१
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ||३१||
श्लोक अर्थ - हे केशवा मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल,असे मला वाटत नाही. युद्धाच्या विपरीत परिणामाचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे.
श्लोक क्रं ३२
न कांड्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च
किं नो राज्येन गोविन्द किं भोगेर्जीवितेन वा ३२॥
श्लोक अर्थ:-हे कृष्णा! मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविन्दा आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे ?
श्लोक क्रं -३३
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यत्कवा धनानि च ॥ ३ ॥
श्लोक अर्थ :- आम्हांला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत.. (३३)
श्लोक क्रं-३४
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः
मातुलाः श्वशूराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ ३४ ॥
श्लोक अर्थ:-आचार्यादी स्वजनांचे वर्णन आणि आणि त्यांना न मारण्याची इच्छा अरर्जुनाने प्रकट केली. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत.(३४)
श्लोक क्रं ३५
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ।। ३५।।
श्लोक अर्थ:-हे मधुसूदना ! हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा ? (३५)
श्लोक क्रं ३६
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन
पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः॥३६॥
श्लोक अर्थ:-हे जनार्दना!धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हांला कोणते सुख मिळणार ? या आततायी ना मारून आम्हालाच पाप लागणार.||३६||
श्लोक क्रं ३७
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७॥
श्लोक अर्थ :-म्हणूनच हे माधवा ! आपल्या बान्धवांना धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार ?(३७)
श्लोक क्रं ३८
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८||
श्लोक अर्थ:-जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना ! कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये?(३८)
श्लोक क्रं ३९
कथं ज्ञेयमस्माभिःपापादस्मान्निवर्तितुम्
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्धिर्जनार्दन ||३९||
श्लोक अर्थ:-जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना ! कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये?(३९)
श्लोक क्रं ४०
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥
श्लोक अर्थ:- कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. (४०)
श्लोक क्रं ४१
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्रिय: ।
स्रीषु दुष्टासु वाषर्णेय जायते वर्णसंकर: ॥४१॥
श्लोक अर्थ:- हे कृष्णा ! पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वाषर्णेया ! स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. (४१)
श्लोक क्रं ४२
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्यच
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४२॥
श्लोक अर्थ:-वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात.
श्लोक क्रं ४३
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ||४३|।
श्लोक अर्थ:-या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म आणि कुळधर्म उध्वस्त होतात.(४३)
श्लोक क्रं- ४४
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥
श्लोक अर्थ-हे जनार्दना ! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत.॥४४॥
श्लोक क्रं-४५
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः
॥४५॥
श्लोक अर्थ -अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे ! आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे !(४५)
श्लोक क्रं ४६
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्
॥४६॥
श्लोक अर्थ:-जरी शस्त्ररहित व प्रतीकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल.॥४६॥
संजय उवाच
श्लोक क्रं ४७-
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः || ४७||
श्लोक अर्थ:-संजय म्हणाला- रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला.(४७)
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेऽर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १॥