छत्रपती शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य
शिवकाळात शक्य त्या सर्व मंदिरांमध्ये जिजाऊसाहेबांनी एक तरी दिवा अविरत सुरू ठेवला. आपण स्वतःला मावळे म्हणावतो. मावळे म्हणजे कोण ? ज्यांनी कधीही आऊसाहेबांचा आणि शिवबाराजेंचा शब्द खाली पडू दिला नाही.
मग आऊसाहेबांचे जे संकल्पित; ते आपण विसरून कसे चालेले!! हि फक्त सुरुवात आहे, जी आपण केली खेळणा उर्फ विशाळगडापासून. दिनांक १६ जुलै रोजी दिवाबत्ती साठी गडावरील सर्व मंदिरांमध्ये किमान तीन महिने पुरेल इतके साहित्य विशाळगडावरील पुजार्यांकडे सुपूर्त करण्यात आले. असेच साहित्य आपण मागच्या वर्षी देखील पोहच केले होते परंतु प्रबळ अर्थसहाय्य नसल्या कारणाने आपण लवकर दिवाबत्ती साठी साहित्य लवकर पोहचवू शकलो नाही. पण आता माघार नाही कारण आम्हाला विश्वास आहे, तुम्ही मंडळी आमची साथ कधीच सोडणार नाही. तुम्ही जमा केलेल्या मासिक निधीतूनच हे सर्व साहित्य खरेदी करून देण्यात. विशाळगडावर सर्व मंदिरे अखंड तेजोमय राहण्यामध्ये तुम्हा सर्व निधी दात्यांचा खारीचा वाटा आहे. असेच सहकार्य करत रहा. हे कार्य कधीच थांबणारं नाही. 💯🚩
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩