छत्रपती शंभुराजे परिवार 

वेड इतिहासाचे महाराष्ट्र राज्य 
मार्फत नाशिक विभागीय मुख्य मोहिम
 आणि दुर्ग सेवकांचा मेळावा

श्री चांदवड किल्यावर ही मोहीम ६ वी व २०मे व२१ मे रोजी दोन दिवसीय मोहीम हजर करण्यात आली होती. या मोहिमेस छत्रपती संभाजीमहाराज नगर येथील फुलंब्री येथील शाळेचे २५ विद्यार्थिनी व विद्यार्थी हजर झाले होते.
तसेच नाशिक पुणे सातारा वैजापूर सिन्नर संगमनेर येथून दुर्ग सेवक व दुर्गसेविका हजर झाले होते मोहिमेची सुरुवात सकाळी ९ वा किल्यावर असलेल्या श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली . नंतर सर्व दुर्ग सेवक किल्याच्या दिशेने गेले . किल्यावर गेल्यावर किल्ल्यावरील पाण्याचे टाके मधील माती दगड काढले ३ टक्यांस मोकळा श्वास दिला,नंतर ४ वाजता सर्व दुर्ग सेवक किल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री रेणुका माता मंदिराच्या आवारात भक्त निवास येथे आले. संध्याकाळी सर्व फ्रेश होऊन श्री हनुमान चालीसा पाठघेण्यात आला,त्याच नंतर गीताकुंज विद्यालय फुलंब्री येथील विद्यार्थिनींनी मर्दानी खेळ करून दाखविला. त्यानंतर रात्री गडगोधळ घेण्यात आला.नंतर जेवण करून सर्वांनी भक्त निवास मध्ये आराम केला २१ तारखेला सकाळी सर्वांनी फ्रेश होऊन श्री रेणुका माता देवीचे दर्शन घेऊन इच्यापूर्ती गणेश मंदिराकडे प्रस्थान केले तेथे गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन मंदिराच्या परिसरात चर्चा सत्र घेण्यात आले. चर्चा सत्र झाल्यावर सर्व रंगमहाल(होळकर वाडा)कडे प्रस्थान करण्यात आले.
रांगमहलात आल्यावर वाड्यातील साफ सफाई केली. साफ सफाई झाल्यावर सर्वांनी रंगमहाल चा फेर फटका मारला . नंतर वाड्यात नाष्टा करून मोहिमेची सांगता झाली .
 






!! वारसा मराठा साम्राज्याचा!!
!! वसा गडकोट संवर्धनाचा!!