छत्रपती शंभुराजे परिवार

नाशिक विभाग आयोजित

किल्ले चांदवड दुर्गसंवर्धन मोहीम 


किल्ले चांदवड हा मुंबई-आग्रा महामार्गालगत चांदवड शहरापासुन जवळच आहे. इतिहासात या किल्ल्याला मोठे महत्त्व प्राप्त होते. अगस्ती ऋषींचे वास्तव्य असलेला, राष्ट्रकुटकालीन खान्देशचा राजा श्री शेऊणचंद्र यांची उपराजधानी असलेला, ‘तामलिंदापुरम्’, माहुरनिवासनी देवी रेणुकेचा भक्त यादववंशीय राजा चंद्रहास यांची राजधानी ‘चंद्रदिव्यपुरी’ आणि मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला आहे. या मोहिमेस नाशिक जिल्हा तसेच चाळीसगाव,सिन्नर, संगमनेर येथून मावळे व शिवकन्या उपस्थित होते.
● मोहिमेत पूर्ण केलेली कामे..
◆ किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यातील मोठे दगड व माती बाहेर काढली.

◆ टाक्यांच्या परिसरातील झाडेझुडपे काढून परिसर पूर्णपणे स्वच्छ केला.

◆ छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमापुजन करुन व जयघोषाने मोहिमेची सुरुवात व सांगता झाली

!! वारसा मराठा साम्राज्याचा!!
!! वसा गडकोट संवर्धनाचा !!