छत्रपती शंभुराजे परिवार निपाणी-चिकोडी विभाग बुरुजसंवर्धन मोहीम..!
प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून छत्रपती शंभुराजे परिवार निपाणी-चिकोडी विभागातून बुरुज संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली होती.
◆ या मोहिमेत बुरुज परिसरातील स्वच्छता करण्यात आली त्याच सोबत बुरुजावर उगवलेली झाडे झुडपे काढण्यात आली.
◆ बुरुजावर असलेला जुना भगवा काढून त्या ठिकाणी नवा भगवा ध्वज लावण्यात आला.
◆ बुरुजाच्या तडबंदीत असलेले गवत व झुडपे काढण्यात आली.
या बुरुज संवर्धन मोहिमेस निपाणी चिकोडी विभागातून छत्रपती शंभुराजे परिवाराचे दुर्ग सेवक उपस्थित होते , मोहिमेचे नियोजन निपाणी विभाग अध्यक्ष सुरज भाऊ शेळावडे , चिकोडी विभाग अध्यक्ष सुरेश दादा पवार आणि बेळगाव जिल्हा अध्यक्ष लखन भाऊ यादव यांनी केले होत..