छत्रपती शंभुराजे परिवार सातारा विभाग आयोजित वैराटगड संवर्धन मोहिम..!!
जब देश पे खतरा बडा था,
तब पानिपत मे भगवा गाढे
"मराठा" अकेला खडा था..!!🚩
अब्दाली पासून भारतमातेचे रक्षण करण्यासाठी पानिपत च्या रणांगणात उपाशी पोटी मराठे लढले. हजारो वीरांना वीरगती मिळाली तर अनेकांना कैद केले गेले. तो दिवस होता मकरसंक्रातीचा. पानिपत युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शूर वीरांना अभिवादन छत्रपती शंभुराजे परिवार सातारा विभागाने अनोख्या पद्धतीने केले. शिवछत्रपतींनी उभरलेल्या हिंदवी स्वराज्याचे मुकसाक्षीदार म्हणजे गडकिल्ले. तेच गडकिल्ले आज दुरावस्थेत पडले आहेत. या गडकोटांच्या संवर्धनासाठी छत्रपती शंभुराजे परिवार तसेच महाराष्ट्रातील इतर अनेक संस्था कार्यरत आहेत.
पानिपत शौर्य दिनानिमित्त छत्रपती शंभुराजे परिवार सातारा विभागातून दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी वैराटगड संवर्धन मोहीम आयोजित केली होती.
◆ मोहिमेत केलेली कामे ◆
किल्ले वैराटगडावर दोन मोहिमेदरम्यान करण्यात आलेली कामे :
१)गडावरील ५ पांडवकालीन टाक्यांमधील गाळ काढून टाक्या स्वछ करण्यात आल्या.
२)पायरी मार्गावरील व तटबंदी वरील गवत काढण्यात आले.
३)चुन्याचा घाना साफ करणात आला.
४)सरदारांचे वाडे मातीने पूर्णपणे बुजले होते त्यातील माती काढण्यात आली.
५)महादरवाजा मार्गातील तटबंदीची दगडे ढासळली होती ती दगडे वर आणून पुन्हा रचण्यात आली.
◆ किल्ले वैराटगडावर ३ ऐतिहासिक पाण्याचे टाके आहेत. या टाक्यातील पाणी दूषित झाले होते तसेच हे टाके मातीने & दगडांनी भरले होते. या टाक्यांना स्वच्छ करून तसेच टाक्यातील मोठं-मोठी दगड फोडून बाहेर काढण्यात आली. किल्यावर असलेले नकुल-सहदेव टाके तसेच इतर टाक्यांना शेकडो वर्षानंतर आज मोकळा श्वास मिळाला. या दुर्गसंवर्धन मोहिमेत छत्रपती शंभुराजे परिवारातील सातारा, बेळगाव, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली, माळशिरस व इतर भागातून दुर्गसेवक एकत्रित आले होते. सर्व दुर्गसेवकांचे मनःपूर्वक आभार 🙏🏼🚩
छत्रपती शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य 🚩
!! वारसा मराठा साम्राज्याचा !!
!! वसा गडकोट संवर्धनाचा !!