छत्रपती शंभुराजे परिवार (वेड इतिहासाचे) महाराष्ट्र राज्य माळशिरस विभाग आयोजित दिपोत्सव सोहळा🧡🚩
अतिशय उत्साहात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील परिसराची स्वच्छता करून दिपोत्सवास आरंभ केला. महाराजांच्या स्मारकाची पूजा परिवाराचे माळशिरस विभाग प्रमुख रोहित दादा यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर गारद, प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र म्हणून पूजा संपन्न झाली.उपस्थित सर्व मान्यवरांना छत्रपती शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य विषयी माहित देऊन सर्वांना शिवकार्य आणि समाजकार्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. परिवारात गेले अनेक वर्ष सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थित सदस्यांना देण्यात आली. दिपोत्सव सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांनी आम्ही नव्या जोमाने आणि उत्साहाने काम करू असा शब्द देखील दिला.🙏🏻🚩



