‼️ छत्रपती शंभुराजे परिवार ‼️
महाराष्ट्र राज्य
🚩 वेड इतिहासाचे 🚩

--------------------------------------

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष

******************************


८ नोव्हेंबर इ.स.१६५९

(मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके १५८१ संवत्सर विकारी वार मंगळवार)


अफझलखान जावळीस पोहचला !

          सर्व संकटांना तोंड देऊन त्यांच्याशी अफझलखानाचे लष्कर व खासा खान जावळीला येऊन पोहचला. त्या घनदाट जंगलात पोहचताच खानाला आता जावळी आपल्या हाती आलीच असे वाटू लागले . तर चाहु बाजुंनी डोंगरांनी वेढली गेलेली जावळी पाहताच खानाच्या सैन्याची छाती दडपून गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुमारे एक कोसावर पारगावनजीक कोयनेच्या काठी पाण्याची सोय पाहुन खानानी छावणी ठोकली. जावळीचा परिसर खानाच्या फौज फाट्यामुळे गजबजून गेला. जावळीला पोहोचताच खानाचे वकील प्रतापगडावर गेले व त्याने रितसर खान आपल्या म्हणण्यानुसार जावळीस आला असल्याची बातमी महाराजांना दिली.

८ नोव्हेंबर इ.स.१६७५

भाई मतिदासांचा अमानुष वध!

शके १५९७ च्या मार्गशीर्ष शु.१ रोजी तेगबहादुरांचे अनुयायी भाई मतिदास यांचा करवतीने कापून वध करण्यात आला. या वेळी दिल्लीस मोगलांचा शेवटचा पराक्रमी आणि जुलमी बादशहा औरंगजेब राज्य करीत होता. हा बादशहा मोठा धर्मांध आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वासघात, कपटविद्या, हृदयहीनता, इत्यादि दुर्गुणांचा सांठाच त्याच्याजवळ होता. याच्या राक्षसी धर्मप्रेमांत अनेक अपराधी, निरपराधी लोकांची आहुति पडत असे. शेंकडों माणसे हालअपेष्टा भोगीत दिवस कंठीत असत. शीखांचे गुरु तेगबहादूर यांनी मुसलमानी धर्मास मान्यता दिली नाही, म्हणून त्यांना कैदेत पडावे लागले. अनेक अनुयायी त्यांचाच मार्ग चालत होते. गुरुहतेग बहादुराच्या अनेक शिष्यांना प्राणदंडहि सोसावा लागत होता. मार्गशीर्ष शु. १ रोजी घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे. धर्मासाठी प्राण देणाऱ्या हुतात्म्यांच्या इतिहासांत हा प्रसंग आपल्या तेजाने सदैव तळपत राहील असाच आहे. तेग बहादुराबरोबर ‘मतिदास' नावाचे त्यांचे शिष्य दिल्लीस कैतच होते. त्यांच्या वधाचे फर्मान बादशहाकडून निघाले! “ऐन मध्यान्हींच्या सुमारास करवतीने इंच इंच याप्रमाणे डोक्यापासून त्यांना चरचरां कापण्यांत आले. असे कापले जात असतां प्रतिक्षणी त्यांना 'अजून तरी मुसलमान होतोस काय?' असे विचारण्यात येत असे. व प्रत्येक वेळी ते धीरोदात्तपणे 'नाही' असे उत्तर देत असत. नुसते वर्णन वाचूनहि अंगावर शहारे येण्यासारख्या या अनन्वित वेदनांत मतिदासजीनी नुसता सुस्कारा देखील सोडला नाही. अखेरीस तिळातिळा येवढया कापलेल्या मतिदासजीच्या रक्ताचा सडा दिल्लीच्या चांदणी चौकांत पडला. पण त्यांचा आत्मा मात्र हिंदु म्हणूनच परलोकास गेला." शीखांचा सर्वच इतिहास अशा स्फूर्तिदायक आणि उदात्त घटनांनी भरलेला आहे. मतिदासांच्या वधानंतर तीनचार दिवसांतच गुरु तेगबहादुर यांचा वध झाला.

मतिदासीप्रमाणेच तेग बहादुरांनीहि अलौकिक धैर्य दाखविले.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


८ नोव्हेंबर इ.स.१६८१

मराठा फौजेने इंग्रजांच्या धरणगाव वखारीतील दारूगोळा रातोरात गायब केला.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


८ नोव्हेंबर इ.स.१८०५

आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरांचा (भांगरे) जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणार्‍या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले.

कमोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


 जय जगदंब जय जिजाऊ

  जय शिवराय जय शंभूराजे

जय गडकोट

!! हर हर महादेव !!

🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

-------------------------------------------------