‼️ छत्रपती शंभुराजे परिवार ‼️
महाराष्ट्र राज्य

🚩 वेड इतिहासाचे 🚩


शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष

******************************

७ नोव्हेंबर इ.स.१६७७

"दक्षिण दिग्विजय मोहीम"
"छत्रपती शिवराय" गदग प्रांतात दाखल झाले.


🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻


७ नोव्हेंबर इ.स.१६८१

निजामशाहीचा तिसरा सुलतान हुसैन निजामशाह (पहिला)याने इ.स.१५५३ ते १५६५ या काळात अहमदनगरला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम केले होते.सण १६०० पासून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये अचानक अहमदनगर वर हल्ला करून ७०० घोडे व काही हत्ती लुटून नेले होते.संभाजीराजेंनी सत्तेवर येताच या किल्ल्यावर हल्ले सुरू केले होते.१६८१ च्या नोव्हेंबर महिन्यात संभाजीराजेंचे २५ हजार सैन्य अहमदनगर लुटण्यासाठी त्या भागात आले होते. तिथल्या मुघल सैन्याने मराठ्यांना प्रतिकार केला.तेंव्हा मुघली सैन्याला हुलकावणी देत ही मराठी सेना वैजापूरकडे सरकली.त्यांच्या पाठलागावर असणारा मुघल सरदार बुलंदखानाने दिवस मावळण्याच्या वेळेस वैजापूरजवळ मराठ्यांना गाठले. दोन्ही सैन्यात तुंबळ लढाई होऊन त्यात दोन्हीकडील सैनिक मारले गेले.या लढाईत नगरचा किल्लेदार मुकीमखानाने मराठ्यांना किल्ल्यात शिरू दिले नाही.ज्या मराठ्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडून त्याने ठार मारले.त्याच्या या कामगिरीबद्दल औरंगजेबाने त्याला ५०० जात व १०० स्वारांची तैनात दिली.


७ नोव्हेंबर इ.स.१६८४

स्वराज्यावर मोठ्या सैन्याबळाने चालून आलेल्या औरंगजेबाने मराठ्याविरोधात लढताना तळकोकण व कल्याण भिवंडी येथे आलेल्या अपयशाने तिथले आपले सैन्य काढून घेतले.असे असले तरी त्याच्या आदेशाने मुघल सैन्याने सण १६८४ मध्ये उत्तर कोकणात आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या.या भागात असणारा तेल्या घाटाच्या डोंगरातील कोथळागड हा महत्वाचा किल्ला होता, कारण या किल्ल्यावर मराठ्यांच्या हत्यारांचा साठा असे. औरंगजेबाने मुखलीस खानाचा जावई अब्दुल कादिर याला पाठवले होते.कोथळागडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना आपल्या चाकरीत घेऊन अब्दुल कादिरने त्यांच्या सहाय्याने गडावर हल्ला केला,त्याच्या सोबतीला मुघल सरदार माणकोजी पांढरे हाही गेला होता.आपलीच माणसे आली आहेत अश्या गैरसमजातून मराठ्यांनी किल्ल्याचे दरवाजे उघडले. त्यातून आत शिरून मुघलांनी जोरदार लढाई करून गड आपल्या ताब्यात घेतला.हा गड जिंकून घेतला म्हणून गडाची सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली.जेधे शकावलीप्रमाणे मुघलांनी कोथळागड घेतला ती तारिख होती 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

७ नोव्हेंबर इ.स.१६८८

सोंदेचा राजा व पोर्तुगीज ह्यांनी  स्वराज्याच्या विरुद्ध  मोगलांना जाऊन मिळून दोस्ती केली.आणि स्वराज्य विरोधी भुमीका जाहीर केली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻


७ नोव्हेंबर इ.स.१७३६

मुंबईचा गव्हर्नर जॉन हॉर्नच्या सांगण्यावरून कॅप्टन इंचबर्ड विजयदुर्गावर वाटाघाटींसाठी आला. डर्बीच्या खलाश्यांना सोडवणे हे कामही त्याला सांगितले होते. इथेही त्यांचा एक डाव होता. इंग्रज कैद्यांसाठी म्हणून त्याने काही पत्रं आणली होती. प्रत्येक पत्रात सोन्याच्या पुतळ्या (व्हेनेशियन डुकाट्स) लपवलेल्या होत्या. वेळ पडताच कैद्यांनी आंग्र्यांच्या पहारेकऱ्यांना त्याची लाच द्यावी व तुरूंगातून निसटायची योजना आखावी हा इंचबर्डचा हेतू होता. पण आंग्रे त्यालाही पुरून उरले. त्यांनी ती कैद्यांसाठीची पत्रंही इंचबर्डला आधी उघडायला लावली. त्यातूनही त्यांना ९०० सोन्याच्या पुतळ्यांची ‘लूट’ मिळाली! कैद्यांनी आपले सोने परत मिळावेत म्हणून बऱ्याच विनंत्या केल्या. शेवटी आंग्रे कबूल झाले पण त्यांनी अट घातली की ते चांदीच्या रुपयांत त्या सोन्याची किंमत देतील. चांदीचे रूपये कुठले - तर डर्बीवर लुटलेल्या चांदीचेच आंग्र्यांनी रूपये पाडले आणि कैद्यांना दिले. ह्यांना ‘बंदर राजापूर नाणी’ म्हणतात. मुघल बादशाह मुहम्मदशहाच्या नावाने ही नाणी पाडली गेली. म्हणजे गंमत पहा - चांदी इंग्रजांची - नाणी पाडणार आंग्रे - मुघल बादशहाच्या नावाने - आणि देणार पुन्हा त्याच इंग्रजांना - त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याच्या मोबदल्यात. ह्यात आंग्र्यांचे नुकसान शून्य होते!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

७ नोव्हेंबर इ.स.१७६२

"राघोबादादा पेशवे" यांचा पुण्यावर हल्ला. "माधवराव पेशवे" यांच्याविरूद्ध घोडनदी येथे लढाई. ५ दिवस चाललेल्या या लढाईनंतर १२ नोव्हेंबर रोजी राघोबादादा "आळेगाव" येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यांना शरण गेले.

७ नोव्हेंबर इ.स.१८६२

दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

७ नोव्हेंबर इ.स.१८७९

वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇

 जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
 जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻
-------------------------------------------------