‼ छत्रपती शंभुराजे परिवार ‼
महाराष्ट्र राज्य
🚩 वेड इतिहासाचे 🚩
--------------------------------------
शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष
************
१ नोव्हेंबर इ.स.१६५९
(कार्तिक वद्य द्वादशी, शके १५८१, संवत्सर विकारी, वार मंगळवार)
खानाची भेट निश्चित होत होती.
गोपीनाथपंत अफजलखानाच्या डेऱ्यात फेऱ्या मारत होते. त्यांच्या बरोबरचे हेर छावणीची बातमी काढत होते. राजे भेट जावळी येथेच व्हावी आणि ती पण किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी यासाठी आग्रही होते त्यामुळे तसे ठरलेही होते. खानाच्या फौजेसाठी रस्ता करून देण्यात आला जेणेकरून मखानाला श्रम पडू नयेत राजे घाबरलेत असे वाटावे. खान हळूहळू वाईहून जावळी कडे सरकू लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ नोव्हेंबर इ.स.१६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला. १६७७ च्या अखेरीस जिंजीवरून (आत्ताचे तामिळनाडूत) रायगडावर परतण्यासाठी निघाले, वाटेत ते तिरूवन्नमलाई येथील प्रसिद्ध अरूणाचलेश्वर मंदिरात आले. अरुणाचलेश्वर मंदिरात एक हजार स्तंभ असलेला मंडप उभारला गेला जो आजही अस्तित्वात आहे. या मंडपासमोर शिवाजीराजांनी एक गोपुरही उभारले. तसेच, या मंदिराच्या मागे एक उंच टेकडी आहे तिथे तर त्रिपुरी पौर्णिमेस एक हजार घागरी तुपाचा भव्य नंदादीप लावण्याची प्रथा होती व आजही आहे. मात्र त्यावेळी ही प्रथा यावनी प्रभावाखाली बंद पडली आहे असे महाराजांना समजले तेव्हा महाराजांनी हा दीपोत्सव पुन्हा सुरु केला. इस १६७७ सालची त्रिपुरी पौर्णिमा ३० ऑक्टोबर रोजी होती. त्यामुळे साधारण यासुमारासच शिवाजीराजांनी हे अतिशय महत्त्वाचे धार्मिक क्रुत्य केले होते. हे कार्य आटपुनच महाराज पुढे निघाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१ नोव्हेंबर इ.स.१६७८
(कार्तिक वद्य द्वादशी, शके १६००, संवत्सर कालयुक्त, वार शुक्रवार)
युवराज शंभुराजे व महाराणी येसूबाई शृंगारपुरी आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ नोव्हेंबर इ.स.१६७९
केग्वीन मराठ्यांच्या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश:-
“नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात. आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल …” ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१ नोव्हेंबर इ.स.१६८३
पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक १ नोव्हेंबर १६८३ रोजी विरजई आल्वोरने फोंड्याला मोर्चे बांधले, ३ तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रीगो द कोस्त हा हल्ला चढवत होता. फोंडा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम ६०० मराठ्यांची शिबंदी होती तर २०० जण किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते. संभाजीराजेंनी फोंड्यास पोर्तुगीजांवर बाहेरून हल्ला चढवला. येसाजी कंक व कृष्णाजी कंक यांनी युद्धात मोठा पराक्रम केला. या युद्धात कृष्णाजींना वीरमरण आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻
-------------------------------------------------
