‼ छत्रपती शंभुराजे परिवार ‼
महाराष्ट्र राज्य
🚩 वेड इतिहासाचे 🚩
--------------------------------------
शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष
************
३१ ऑक्टोबर इ.स.१६२४
शरीफजी राजे भोसले ह्यांना भातवडीच्या लढाईत वीरमरण....!!
खंडागळे हत्ती प्रकरणात जाधव व भोसले घराणे रणमैदानावर पुन्हा एकदा आमने सामने होते. भातवडीचे युद्ध है निजामशाही विरुद्ध आदिलशाही व मोगल यांच्यात झाले या युद्धाअगोदर लखुजी जाधव व शहाजीराजे हे अहमदनगरच्या निजामशाहीतच सेवेत होते. आहमदनगरची सुत्रे मलिकअंबर याच्या हातात होती. मलिक अंबर अतिशय पराक्रमी होता. परंतु मोगली सैन्याने ४ फेब्रुवारी १६१६ ला निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याचा दारुन पराभव केला. मलिक अंबर पळत असताना मोगली सैन्याने त्याचा पाठलाग केला या पाठलागात निजाम शाहीचे बरेच सरदार, बरेचसे सामान, पोडे मोगलांच्या हातात सापडले. मलिक अंबरला बराचसा प्रदेश गमवावा लागला.
मोगलापुढे शरणागती पत्करल्यामुळे मलिक अंबरची प्रतिष्ठा पार धुळीस मिळाली होती, तेव्हा आपली बाजू सुरक्षीत करण्यासाठी त्याने अनेक मराठे सरदारांना अमिषे देणे सुरू केले. त्यामुळे लखुजी राजे जाधव, बापुजी कारे, उदाराम हे मलिक अंबरला मिळाले मलिक अंबरच्या मराठा कारगिरांनी फार मोठा पराक्रम करून मोगली सैन्याला सळो की पळो करून सोडले. त्यामुळे मोगल बादशहाजहाँगीरने शहाजादा खुर्रम यास बरेचसे सैन्य देऊन दक्षिणेस पाठविले. मात्र शहाजी राजे निजामशाहीत मलिक अंबरचा पक्ष धरुन राहिले, लखुजी राजे जाधव मोगलांना जावून भेटल्याने मोगलांना प्रचंड आत्मविश्वास वाढला. त्यामुळे मोगलांनी अहमदनगर व अहमदनगर जवळील भातवडीच्या अंगलात घनघोर युद्ध झाले या युद्धात मलिक अंबर हा सेनापती होता. मात्र तो नावापुरताच होता. कारण आता त्याचे वय ८० वर्षांचे होते. या ठिकाणी युद्धाची पूर्ण व्युहरचना ही शहाजी राजे भोसल्यांनी केली होती. हे युद्ध १६२४ मध्ये झाले, या युद्धात त्यांनी मोगल व आदिलशाही या दोन्ही सैन्याचा धुव्वा उडवीला. या युद्धात मोगलांचा सुभेदार लष्करखान व येदीलशाही मुला महमद यैसी दोन कटके मलिक अंबरने बुडविली. असे वर्णन जेधेशकावली मध्ये आले आहे
या युद्धात मोगली लष्करखानाच्या बाजूने जाधव मंडळी होती. कविद्र परमानंद लिहितात :
"रामब, अंचल, जसवंत आणि बहादुर है जाधव रावांचे पुत्र आणि स्वतः बला जाधवराव है सर्व लषकर खान सेनापतीसह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञाने दक्षिणेत प्राप्त झाले..
या लढाईत विजय मिळविल्यामूळे शहाजी राजेंचा फार मोठा मान सन्मान निजामशाहीमध्ये वाढला होता. या लढाईत शहाजीराजेंचे भाऊ शरिफजी राजे भोसले ठार झाले शहाजी राजेंचा निजामशाहीत प्रभाव वाढल्यामुळे मलिक अंबर त्यांचा द्वेष करू लागला, शहाजी राजेंना शहदेण्यासाठी त्याने भोसले घराण्यात गृहकलह सुरू केला. त्याने शहाजींच्या चुलत बंधू शहाजी विरूद्ध विथवले. त्यांना त्यामुळे प्रचंड कंटाळा आला. "चुलत भाऊ सुद्धा शहाजींचा प्रचंड हेवा करू लागले. तेव्हा शहाजीराजे कंटाळून जाऊन आपल्या जहागिरीत गेले व तेथे राहु लागले. नंतर आदिलशहाने त्यास सरलष्कर म्हणून घेतल्याने ते निजामशाही सोडून आदिलशाही चाकरित शिरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
३१ ऑक्टोबर इ.स.१६७९
दिलेरखान व युवराज शंभुराजे विजापूरवर चालून गेले, विजापूरला सिद्दी जौहरचा जावई मसाऊद ऊर्फ मसूद हा वजीर होता, दिलेरखान चढाई करून येतो आहे हे समजताच मसुदचे धाबे दणाणले, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांस मदतीकरता हाक दिली, महाराजांनी विजापूरच्या रक्षणासाठी दहा हजार फौज रवाना केली व मागहून स्वतः महाराज मोरोपंत पिंगळ्या सह विजापूरजवळ दिनांक ३१ ऑक्टोबर १६७९ दिवशी जाऊन पोहचले, महाराजांच्या मनात सुलतानांची भेट घेऊन दक्षिणी सत्ताधिशांची एकजूट बळकट करण्याची इच्छा होती. पण मोरोपंतांनी अशा संकटात जाणे कसे प्रसंग येईल असे म्हणून अक्षेप घेतल्यामुळे भेटीचा बेत सोडून दिला. मात्र दिलेरखान विजापुरावर चालून आला. तेव्हा मराठ्यांनी खानाची रसद मारून छापे घालून त्यास हैराण केले, तो वैतागून गेला. त्याने विजापूरचा वेढा उठवून तिकोट्यास प्रयान केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
३१ ऑक्टोबर इ.स.१७७३
छत्रपती राजारामांनी अत्यंत साधेपणाने पेशवाईची वस्त्रे अमृतरावांच्या हाती सुपूर्त केली. छत्रपतींना नमस्कार करून अमृतराव साताऱ्यात जास्त दिवस न थांबता पुण्याला येण्यास निघाले. रघुनाथरावांना साताऱ्यातल्या या साऱ्या घडामोडी समजत होत्याच, अमृतराव साताऱ्यात गेले तेव्हा त्यांचे वय फक्त नऊ वर्षांचे असल्यानेच त्यांना कदाचित कोणी काहीही बोलले नसावेत. ऑक्टोबरच्या अखेरीस अमृतराव पुण्याच्या जवळ आले असता रघुनाथरावांनी त्यांना थेट आळेगावास जाण्याचा निरोप पाठवला. रघुनाथरावाना पेशवेपदाची सूत्र मिळण्यात पुण्यातले लोक कदाचित आडकाठी आणतील म्हणून त्यांनी आळेगावला जाऊन दि. ३१ ऑक्टोबर १७७३ रोजी स्वतःच वस्त्र धारण केली आणि नंतर गुपचूप पुण्यात परतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
३१ ऑक्टोबर इ.स.१७६१
नरुटे घराणे-इंदापूर परगण्यातील काझड गावच्या नरोटे पाटलांविषयी शिवचरित्र साहित्य खण्ड ३ मध्ये २ पत्रं उपलब्ध आहेत. या गावात शिवरायांनी मोरया गोसावी यांना इनाम दिल्याच्या नोंदीही मिळतात. ऑक्टोबर १७६१ रोजी लखोजी बिन मालोजी पाटलाला लिहलेल्या पत्रात नरोटे पाटलांचा मूळ पुरुष म्हणून लखोजी पाटिल थोरले यांचा उल्लेख मिळतो.या लखोजीला संतान नसल्यामुळे त्यांनी पराजी पाटलांचा लेक सिदोजी पा. ला दत्तक घेतले त्याने मोकादमी केल्यानंतर त्याच्या पोटी लखाजी झाला त्याने मोकादमी केली. या लखोजी पाटलाच्या काळात गावावर दादोजी कोंडदेवची स्वारी झाली , या लढाईमध्ये दादोजी चा पुतण्या मृत्यूमुखी पडला. तेव्हा लखोजी पाटलांना धरून आणण्यात आले आणि खुनाचा बदल्यात खून मागितला. यावेळेला तुकोजि पाटिल भलेरायाचे विल्हेचा हा लखाजिंच्या मदतीस धावून आला आणि तो लखाजींला बोलला कि "जे मी खून देतो मी मेलो तरी माझी मुले लेकरे पोसशील आणि पाटीलकीही राकशील आणि तुला मारले राहणार नाही, आज मुले माणसेही जगणार नाहीत ". असा विचार झाल्यानंतर तुकोजीला मारण्यात आले. शके १६७४ माघ शु.३/ इस १७५३ फेब्रु ६ ला लिहिलेल्या पत्रात या घराण्याची ५ ते ६ पिढ्यांची वंशावळ मिळते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻
-------------------------------------------------
