छत्रपती शंभुराजे परिवार(वेड इतिहासाचे)महाराष्ट्र राज्य
🚩 🚩
--------------------------------------
शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष
६ नोव्हेंबर इ.स.१६५९
विजापुराहून आलेला अफजलखान वाईत दाखल. अफजल खानाच्या भेटीसाठी महाराज प्रतापगडाकडे कुच करण्यासाठी निवडक सैन्यासोबत बाहेर पडले. विजापूर दरबारात आपल्याला सेनापती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विडा उचलून अफजुल्या वाईकडे यावयास निघाला.-
वाईतून मग जावळी प्रांतात आला. अफजलखान कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देवून शिवाजी महाराजांनी "हैबतराव, बालाजी सिलीमकर, बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते. अफजलखान आता चांगलाच चक्रव्युहात सापडला होता. माघारी फिरणेही आता शक्य न्हवत. शिवाजी महाराजांनी भेटीच्या अगोदरही खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ नोव्हेंबर इ.स.१६६९
( कार्तिक वद्य अष्टमी, शके १५९१, संवत्सर सौम्य, शनिवार )
🚩संधी गमावली, निराश महाराज पेण येथे आले!
शिवरायांनी जंजिऱ्याला विलक्षण कोंडी केली होती. गेले ६ महिने वेढा करकचून आवळला असल्याने फतेहखान मेटाकुटीला आला होता. अखेर जीविताची हमी मिळाल्यास जंजिरा ताब्यात देण्यास फतेहखान तयार झाला. त्यामुळे जंजिरा स्वराज्यात दाखल होण्याची शुभचिन्हे दिसू लागली होती. परंतु मोक्याच्या क्षणी घात झाला. फतेहखानचा जंजिरा देण्याचा बेत आहे हे लक्षात येताच सिद्धी सुंबळ, सिद्धी याकूत, सिद्धी खैरामीत यांनी बंडाचे निशान फडकावले आणि किल्ला देण्यास नकार देऊन फतेहखानास कैद केले आणि पुन्हा संघर्षास नव्याने उभे राहिले. सिद्धी सुंबळ हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला आनं त्याने औरंग्याशी मैत्रीचा हात पुढे करून मदत मागितली. त्यावेळी मोगली संघर्षामुळे महाराजांना माघार घ्यावी लागली. एक बहुमूल्य संधी गेली. हताश मनाने महाराज पेण येथे परत आले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
६ नोव्हेंबर इ.स.१६७४
रायगडावरील राज्याभिषेक समारंभाचे रसभरीत वर्णन इंग्रज वकिलाने केल्याचे इ. स. १६७६ च्या डायरीत सापडते. त्यानंतर महाराजांनी दिनांक ६ नोव्हेंबर १६७४ रोजी आपला वकील मुंबईकरांकडे पत्र देऊन पाठविला. ह्या पत्रात महाराजांनी इंग्रजाकडून ४० ते ६० हं. वे. वजनाच्या ५० मोठ्या तोफांची मागणी केली. हे पत्र मुंबई इंग्रजांनी सुरत इंग्रजाकडे पाठविले. सुरतकरांनी त्यावर विचार करून महाराजांस कळविले की अशा कृत्याने मोगल बादशहास घुस्सा येईल म्हणून आपली तोफांची मागणी पुरी करू शकत नाही. जानेवारी १६७५त शिवाजी महाराजांची सैन्ये औरंगाबादकडे गेली. ह्या सैन्याने बरीच लूट मिळविली. मोगल सेनापती कुतुबखान याचा पराभव केला आणि हीच फौज बऱ्हाणपुरापर्यंत मोगलांचे गाव लुटीत निघाली. वाटेतील धरणगाव इत्यादी शहरे लुटली व बरीच लूट मिळवली. ' धरणगावला इंग्रजांची वखार होती. ती लुटून फस्त केली. या वखारीचा मुख्य सॅम्युअल ऑस्टीन हा होता व थॉमस हॅगस्टन हा दुय्यम अधिकारी होता. धरणगावची वखार लुटल्यावर हे दोन्ही अधिकारी सुरतेस गेले आणि घडलेली हकिगत व झालेले नुकसान याची माहिती दिली. वखारीतील कापड व दहा हजार रुपये रोकड शिवाजी महाराजांच्या सरदारांनी नेली असे ह्या दोघांनी सांगितले. सुरतकरांनी ही बातमी मुंबई कौन्सिलला कळविली. त्यावर मुंबई कौन्सिलने ठराव केला की, धरणगावच्या वखारीची जी लूट झाली त्याबाबत शिवाजीराजांकडे दूत पाठवून त्याजवळ पत्रे द्यावीत व पत्रात शिवाजी महाराजांकडे संपूर्ण भरपाई मागण्यात यावी. या कामी कौन्सिलने ऑस्टीन यास शिवाजी महाराजांकडे पाठविण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ नोव्हेंबर इ.स.१७२७
पुणे प्रांत युद्धाच्या धामधुमीत असताना, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बाजीरावानी सीमोल्लंघन केले. निजामाच्या मुलुखात घुसण्याचा मनसुबा घेऊन अंदाजे १०००० घोडदळ घेऊन भरधाव दौडत पुणतांब्यावर गोदावरी ओलांडली. पलीकडचा निजामाचा समृद्ध मुलुख लुटला. सिंदखेड, जालना परगणे बेचिराख केले. आपला मुलुख बाजीरावांच्या तावडीत सापडला आहे, हे पाहताच निजाम, ऐवजखान आदी त्यांचा पाठलाग करू लागले. जय्यत तयारीनिशी राऊ साहेबांच्या मागावर जाऊनदेखील ते त्यांना कुठेच सापडत नव्हते. शत्रूला झुकांडी देत राऊ त्यांचे काम निर्वेधपणे पार पाडत होते. राऊंच्या काही जाळपोळ करणाऱ्या टोळ्या इ.स. १७२७ च्या दरम्यान ऐवजखानाच्या तावडीत सापडल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
! हर हर महादेव !
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻
-------------------------------------------------
