‼ छत्रपती शंभुराजे परिवार ‼
महाराष्ट्र राज्य
🚩 वेड इतिहासाचे 🚩
--------------------------------------
४ नोव्हेंबर इ.स.१६५६
(कार्तिक अमावास्या, शके १५८१, संवत्सर विकारी, वार शुक्रवार)
बादशहा मुहम्मद आदिलशहाचा मृत्यू!
इ.स.१६३७ पासून विजापूर सत्ता ही कोकणातील सर्वश्रेष्ठ शक्तिशाली सत्ता होती १४ नोव्हेंबर इ.स.१६५६ रोजी महम्मद आदिलशहा मरण पावला. दाभोळ, अंजनवेल रत्नागिरी, राजापूर येथील किल्ले, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यांसह विजापू सत्तेने नियुक्त केलेल्या सरदारांच्या अधिकारात होते. परंतु उर्वरित दक्षिण कोकण हे परंपरागत चालत आलेल्या देशमुखांच्या नियंत्रणाखाली होते. त्यामध्ये कुडाळचे सावंत हे मुख्य होते. मध्य कोकण दोन सुभ्यांमध्ये विभागलेले होते. पहिला सुभा कल्याण हा वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंत विस्तारलेला, तो मुल्ला अहंमदच्या अखत्यारीत होता, तर उर्वरित सुभा हा सावित्री नदीपर्यंत विस्तारलेला. जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होता ह्या प्रदेशात तळे व घोसाळ्याचे किल्ले सिद्दीच्या मालकीचे होते. उत्तर कोकणात पोर्तुगीज आणि मोगलांची सत्ता होती.मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद इ.स.१६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते आदिलशहा ४ इ.स.नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ नोव्हेंबर इ.स.१६६७
(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, सोमवार)
छत्रपती संभाजी महाराज (छ.संभाजीनगर) औरंगाबादेस !
औरंगाबाद ला शंभू महाराज व जसवंत सिंग यांची भेट झाली. त्यानंतर शंभूराजांना राजगडी पोहोचवून प्रतापराव गुजर काका व निराजी रावजी काका स्वराज्याचे मुतालिक म्हणून २ वर्षे औरंगाबादेस मुक्कामी राहिले. त्यानंतर औरंगजेबाने दोघांना अटक करण्याचे आदेश दिले. पण शहाजदा मुअज्जम याने दोघांना आधीच बातमी कळवली आणि दोघांनी ही रातोरात औरंगाबाद सोडले. वाटेत औरंगजेबाचा प्रदेश लूट करीतच प्रतापराव गुजर काका व निराजी रावजी काका राजगडी परतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ नोव्हेंबर इ.स.१६८०
सवलती चालू ठेवण्याची इंग्रजांची मागणी छत्रपती संभाजी महाराजानी नाकारल्या नंतर त्यांचे धाबे दणाणले व त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. मराठ्यांचे सैन्य मुंबई जवळील कल्याणला होतेच व त्यांचे आरमारही राजापूरला होते. मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेतील त्यांच्या वखारीला लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते की त्यांना संभाजीच्या सैन्याची व नौदलाचा चांगलाच धाक वाटत होता. दौलतखानच्या हाताखाली संभाजीचे पाच हजार लोक राजापूरला असून उत्तरेकडे निघायच्या तयारीत आहेत असे ह्या पत्रातून त्यांनी कळवले आहे. आम्हाला निश्चित बातमी मिळाली आहे की [संभाजी] राजाचे आरमार चार ते पाच हजार लोकांनिशी दौलतखानच्या हाताखाली राजापूरकडे आहे ज्यात सुमारे पन्नास गुराबा व गलबते आहेत. हे आरमार कधीही उत्तरेकडे येऊ शकते. त्यांचा हेतु काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही परंतु आम्ही सिद्दीला बंदरात गलबते नांगरायला परवानगी देतो ते [संभाजी] राजाला अजिबात पसंत नसल्याचे कळते. ह्या धोक्यापासून सावध राहण्याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत जेणेकरून आमच्यावर अचानक आक्रमण होणार नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ नोव्हेंबर इ.स.१७१२
कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
४ नोव्हेंबर इ.स.१८४५
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म, भारतीय क्रांतिकारक हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻
