विठ्ठल आवडी प्रेमभावो ।

विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥ 

तुटला हा संदेहो ।

भवमूळ व्याधीचा ॥२॥

म्हणा नरहरी उच्चार ।

कृष्ण हरी श्रीधर ।

हेची नाम आम्हा सार ।

संसार करावया प्रेमभावो ॥३॥

नेणो नामाविण काही ।

विठ्ठल कृष्ण लवलाही ।

नामा म्हणे तरलो पाही ।

विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥४॥


        -श्री संत शिरोमणी प्रेममुर्ती नामदेव महाराज