पुढें गेले त्यांचा शोधीत मारग ।
चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी ।
पूर्वकर्मा होळी करुनियां ॥२॥
अमुप हे गांठीं बांधूं भांडवल ।
अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥३॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें ।
नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥४॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा ।
होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥५॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा ।
जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥६॥
-श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
