देह गेलियासी मृत्यु कोण म्हणे ।
म्हणती अज्ञाने कांही लोक ॥१॥
खरा मृत्यु तोचि अंगी घड़े पाप ।
नाक अधोरूप होय जगी ॥२॥
संत महंत ते जिवीतची आहे ।
कीर्ति गर्जताहे लोकीं ज्यांची ॥३॥
तुकड्यादास म्हणे काही पुण्य करा ।
संत-पाय धरा जीते व्हाया ॥४॥
-श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
