नये जरी तुज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येईल तैसा बोल रामकृष्ण ॥२॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥३॥
तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥४॥
-श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
